प्रेम भक्ति साधना केंद्र
श्री सिद्धारूढ आश्रम
ॐ नमः शिवाय
प्रेम भक्ति श्री सिद्धारूढ आश्रम हे अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आहे, अत्यंत सुंदर अशीही जागा आसून शांततामय वातावरणात मन प्रसन्न होऊन जीवन जगण्यास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

श्री. सतीशनाना कुलकर्णी
महापौर, नाशिक महानगरपालिका
प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रम निवाने, जि.नाशिक या पवित्र स्थळी प.पू दिदीजींमुळे भेट देण्याची संधी मिळाली, धन्य झालो. आश्रमाच्या परिसरात अध्यात्मिक व पवित्र सकारात्मक ऊर्जा जाणवली. श्री शिवकुमार स्वामींचे दर्शन आणि पवित्र वाणीने मंत्रमुग्ध झालो. जय श्री गुरुदेव.

प्राचार्य श्री डाॅ. बी. एन. पवार
PhD in Chemistry (Austria - Europe), पलूस, सांगली
आयुष्याचा उद्धार करणारे सिद्धपुरुषांचे दर्शन जीवनात एकदाच व्हावयाचे असते असे ऐकले नी वाचले होते.
परम पूज्य दिदीजीं च्या दिव्य साधनेतून प्रकट झालेले प्रेम भक्ति साधना केंद्राला जेव्हा भेट दिली तेव्हा स्वर्गमय अनुभूती आली. दिदीजीं चे अमृतमय बोल त्यांच्या कृपेने प पू श्री शिवकुमार महास्वामीजींचे झालेले दिव्य दर्शन ही सद्गुरू प्रेमाची पोचपावती याच प्रेम भक्ति साधना केंद्रातून झाली व माझे जीवन धन्य झाले.
ओम नमः शिवाय.. ।

डॉ. किशोर मुळे
Dentist, कलाकीरण डेंटल क्लिनिक, नाशिक
निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि स्वतःचा हुकमी शोध लावून देणारं शांत निरामय आणि अध्यात्म तेजाने भारलेलं स्थळ म्हणजे आदरणीय प. पू. मनिषा दिदीजीं चा सद्गुरु श्री सिद्धारुढ स्वामी आश्रम...
भारताची दैदिप्यमान संस्कृती अशा भक्ति व शक्तिस्थानांमुळेच टिकून राहतेय व निरंतर राहणार.
मनिषादिदीजी व सर्व आश्रमीयजनांच्या.. व असंख्य साधकांच्या या तेजोमय वाटचालीस अनंत शुभेच्छा... आपले कार्य उत्तरोत्तर वाढत राहो ही सदैव प्रार्थना

मा. श्री दत्तप्रसाद जोग
कृषी अधिकारी, गोवा
प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रम या पवित्र भूमीला भेट देणे हा खरोखरच एक अतिशय भाग्याचा क्षण होता. आश्रमाचा परिसर आणि वातावरण अत्यंत शांत आहे. मन, शरीर,आत्मा यांना शाश्वततेशी जोडण्याचे स्थान आहे. परम पूज्य दिदीजीं चे ज्ञान, साधनाभ्यास आणि वात्सल्य मंत्रमुग्ध करते.

मा. डॉ श्री दयानंद राव
MBBS, MD Gynaecologist, HOD Govt Medical College, Goa