आजची पिढी ही सुसंस्कारापासून बाजूला जात आहे.
त्यांना चांगले संस्कार मिळावेत आणि त्यांच्यात सुसंस्कार रुजवावेत यासाठी लहान मुलांसाठी आपला आश्रम बालसंस्कार केंद्र चालवत आहेत. बालवयात त्यांच्यात आदर, प्रेम, माणुसकी, आपुलकीची भावना रुजवली जात आहे. उद्याच्या सुजाण, सुसंस्कृत नागरिकत्वाची जडणघडण होण्यास याची नक्कीच मदत होत आहे. आजच्या पिढीपुढे चांगले आदर्श असायला हवेत. लहानपणापासूनच यांच्यात कृतज्ञता, सकारात्मक वृत्ती, मानवता, भूतदया आदी गुणसंपन्नता लाभली पाहिजे. या चिमुकल्यांना उद्याचा सुशिक्षितच नव्हे, तर सुसंस्कृत नागरिक बनवण्यासाठी बालसंस्कार केंद्राची गरज आहे. केवळ धनप्राप्ती हेच जिवनाचे उद्धिष्ट नसून जिवनातील नैतिक मूल्ये ही माणसाची ओळख आहे. हे जाणून बालगोपाळांना संस्कारक्षम बनविण्यासाठी बालवयातच गुरू चरणांशी आणणे अत्यावश्यक आहे.
आपल्या आश्रमात दर रविवारी सकाळी ०८ वाजता दिदीजीं समवेत बालसंस्काराचा वर्ग होतो.