सेवा

"सेवा धर्मो परम गहनो, योगीनामपि परम दुर्लभो"
सेवा धर्म अत्यंत गहन व दुर्लभ आहे. मनुष्य देह प्राप्त झाल्यावर मनामध्ये सेवा भाव जागणे जन्मजन्मांतरीच्या पुण्याईचे फळ आहे.
जगात कल्याणार्थ अवतरीत झालेले परम तत्व श्री सद्गुरूनाथांच्या चरणी तन, मन, धन अर्पण करून सेवा करणे हे सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन आहे. मनुष्य जन्मामध्ये प्राप्त होणारे त्रिविध ताप व पाप यातून मुक्तिचे साधन म्हणजे सेवा.
साक्षात परमात्मा वैकुंठ सोडून श्रीराम व श्री कृष्णाच्या रूपाने अवतरीत झाले. त्यांनी सुद्धा सद्गुरुस्थानी सेवा करून कृपा संपादन केली व सद्गुरूंचे महात्म्य प्रगट केले.
साक्षात शिवाचा अवतार असलेले परम सद्गुरू श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांनी देखील सद्गुरू कृपा संपादन करण्यासाठी अखंड १२ वर्ष भुपूर स्थानी सद्गुरू श्री गजदंड स्वामीजींची सेवा संपन्न केली व आरूढ पदवी प्राप्त केली. असा सेवाभाव मनामध्ये जागवून गुरूस्थानाची सेवा प्राप्त करून जीवन धन्य करणे आपले परम कर्तव्य आहे.

कौशल्य आधारित समाविष्ट सेवा

कलाकृती - रांगोळी, सजावट, ईत्यादी.
कार्यक्रम व्यवस्थापक - नियोजित विविध कार्यक्रमांचे व्यवस्थापन करणे.
सोशल मीडिया - सद्गुरूंचा संदेश पसरवणे आणि सोशल मीडियाद्वारे जन जागृती निर्माण करणे.
ग्राफिक डिझाइन - कार्यक्रम पत्रिका, पोस्टर्स, बॅनर डिसाईन.
व्हिडिओ संपादन - You Tube आणि ब्लॉगसाठी नवीन व्हिडिओ तयार करणे.
फोटोग्राफी / व्हिडिओग्राफी - विविध कार्यक्रमणचे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, थेट प्रक्षेपण(Live streaming).
प्रूफरीडिंग/एडिटिंग - इंग्रजी, कन्नड आणि हिंदी प्रकाशनांसाठी.
वित्त विभागातील लेखा-संबंधित क्रियाकलाप ( Accounts - Related Activity in Finance Department)

Call Now Button